महसूल आस्थापना शाखा
महसूल आस्थापना शाखेची ध्येय धोरणे कामाचे विस्तृत स्वरुप, उपलब्ध सेवा
- सरळ सेवा व पदोन्नतीने भरण्याच्या पदांच्या माहिती शासनास सादर करणेचे कार्यवाही.
- उप जिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्या सर्वसाधारण बदल्यांची माहिती शासनास सादर करणेचे कार्यवाही.
- अधिका-यांना पदोन्नतीचा मानीव दिनांक देणेबाबत.
- उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नतीसाठी आवश्यक ती माहिती, गोपनीय अहवाल, विभागीय चौकशी इ. ची माहिती सादर करणे.
- अधिका-यांचे जात वैधता प्रमाणपत्राची माहिती सादर करणे बाबत.
- सरळसेवेत / पदोन्नतीने नियुक्त झालेल्या अधिका-यांची जेष्ठता यादीसाठी आवश्यक असणारी माहिती वेळेवर सादर करणेबाबत.
- अप्पर जिल्हाधिकारी / उपजिल्हाधिकारी यांचे गोपनीय अहवाल पुर्नविलोकनासाठी पाठविणेबाबत.
- उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार यांचे मुल्यांकन अहवाल व विहीत नमुन्यातील माहिती शासनास सादर करणेबाबत व नायब तहसिलदार संवर्गातील गोपनीय अहवालांचे जतन व संस्करण.
- उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार यांचे हजर झाल्याची तारीख शासनास सादर करणेबाबत.
- राज्य सेवा पुर्व परीक्षेसाठी रिक्त पदांसंबंधी मागणीपत्र शासनास सादर करणेबाबत.
- रिक्त पदांची माहिती वेळोवेळी शासनास सादर करणेबाबत. (नागरी यादी)
- शासनाकडेस प्राप्त झालेल्या तक्रारी संबंधात शासनाने मागविलेले चौकशी अहवाल सादर करणेबाबत.
- अधिका-यांचे विभागीय चौकशी संदर्भात मागणी केलेली माहिती सादर करणे.
- निलंबित अधिका-यांना पुर्ननियुक्तीबाबतच्या प्रस्तांवावर अहवाल सादर करणे. अधिका-यांच्या तक्रारी संदर्भात शासनाकडेस प्राप्त झालेल्या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबत अभिप्राय सादर करणे.
- माहितीचा अधिकारान्वये मागविलेली माहिती शासनास सादर करणे.
- तारांकीत प्रश्न / अतारांकीत प्रश्न / कपात सुचना इ. ची माहिती शासनास सादर करणे.
- लोकसभा आश्वासन पुर्तीबाबतची माहिती शासनास सादर करणे.
- पदांचा आढाव्याबाबतची माहिती शासनास सादर करणे.
- पदे रद्द करणे / नविन पदे निर्मितीबाबतचा अहवाल शासनास सादर करणे.
- उच्च न्यायालयीन प्रकरणातील अभिप्राय/प्रतिज्ञापत्र शासनास सादर करणे.
- सेवानिवृत्त होणा-या अधिका-यांची माहिती शासनास सादर करणे.
- परिविक्षाधीन अधिका-यांची परिविक्षाधीन कालावधीवर नियंत्रण ठेवुन शासकीय सेवा नियमित करणेबाबतची माहिती शासनास सादर करणे.
- महसुल अर्हता परिक्षा व विभागीय दुय्यम सेवा परिक्षांचे आयोजन, संनियंत्रण व निकाल घोषीत करणे.
- गट क संवर्गातील निलंबित कर्मचा-यांच्या निलंबनाचा आढावा घेवुन पुन:स्थापनेबाबत उचीत निर्णय घेणे.
- नायब तहसिलदार संवर्गाची जेष्ठता यादी तसेच अव्वल कारकुन / मंडळ अधिकारी संवर्गाची विभागाची एकत्रित जेष्ठता यादीचे संस्करण व जतन.
- अव्वल कारकुन / मंडळ अधिकारी संवर्गातुन नायब तहसिलदार संवर्गात तसेच नायब तहसिलदार संवर्गातुन तहसिलदार संवर्गात द्यावयाच्या पदोन्नती कामी विभागीय पदोन्नती समितीची बैठक घेणेबाबत कार्यवाही.
अधिक माहितीसाठी खालील पीडीएफ डाउनलोड करा