बंद

    भुसूधार शाखा

    भुसूधार शाखेतील अधिकारी व कर्मचारी यांची कार्ये व कर्तव्ये
    शाखेचे नाव भुसूधार शाखा
    पत्ता विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक
    कार्यालय प्रमुख सहाय्यक आयुक्त, (भूसुधार)
    शासकिय विभागाचे नांव महसूल व वन विभाग
    कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त महसूल व वन विभाग
    कार्यक्षेत्र विभागीय कार्यक्षेत्र
    (नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे व नंदुरबार या पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र)
    विशिष्ट कार्ये भुसूधार कायदयाचे अंमलबजावणी विषयक कामे
    कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0253-2462401 ते 05
    भूसुधार शाखेचे ध्येय धारणे कामाचे विस्तृत स्वरूप उपलब्ध सेवा सुविधा
    अ.क्र. शाखेचे ध्येय वेळ अधिकारी अधिकारी
    1 20 कलमी कार्यक्रमांतर्गत कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत अतिरिक्त ठरलेली जमीन भुमिहीनांना वितरण करणेच्या कामाचे नियंत्रण व पर्यवेक्षण करणे. 15 दिवस सहायक महसूल अधिकारी सहाय्यक आयुक्त (भूसुधार)
    2 आदिवासी ते बिगर आदिवासी अशी विक्री करावयाची जमीन कुळकायदा कलम 43 चे शर्तीची असल्यास जमीन विक्री परवानगी दयावी किंवा नाही या बाबत अभिप्रायासह प्रस्ताव शासनाकडे पाठविणेचे अधिकार करणे, निर्णय घेतला अशा प्रकरणात विशेष भुसूधार अधिकारी यांचे मागणीनुसार मान्यता देलेली रक्कम शासकिय विभागांचे बाबतीत शासनाकडून मंजूर करुन घेणेसाठी प्रस्ताव पाठवणे. 15 दिवस स.म.अ. सहाय्यक आयुक्त (भूसुधार) विभागीयआयुक्त
    3 आदिवासी ते बिगर आदीवासी जमीन विक्री परवानगीचे प्रकरण असल्यास जिल्हाधिकारी यांचा प्रस्ताव तपासुन जमीन विक्रीची परवानगी दयावी किंवा नाही या विषयीचे अभिप्रायासह प्रस्ताव शासना कडे पाठविणे व त्यासंबंधी पत्रव्यवहार 30 दिवस स.म.अ. सहाय्यक आयुक्त (भूसुधार),विभागीय आयुक्त
    4 भटक्या विमुक्त जाती/ जमातीचे धारकाची कुळकायदा कलम 43 च्या शर्तीची जमिन बिगर भटक्या विमुक्त जाती/ जमातीचे धारकास विक्री करावयाची असल्यास जिल्हाधिकारी यांचा प्रस्ताव तपासुन जमीन विक्रीची परवानगी दयावी किंवा नाही या विषयीचे अभिप्रायासह प्रस्ताव शासनाकडे पाठविणे. (कुळ प्रस्तावित झाल्या पासून 10 वर्षे झाली नसतील तर 15 दिवस स.म.अ. सहाय्यक आयुक्त (भूसुधार),विभागीय आयुक्त
    5 महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमीनी प्रत्यार्पित करण्याचा अधिनियम 1974 च्या अंमलबजावणीचे संनियंत्रण करणे. 15 दिवस स.म.अ. सहाय्यक आयुक्त (भूसुधार),विभागीय आयुक्त
    6 महाराष्ट्र कुळकायदा व अशेतजमीन अधिनियम 1948 च्या अंमलबजावणीचे संनियंत्रण व पर्यवेक्षण करणे. 15 दिवस स.म.अ. सहाय्यक आयुक्त (भूसुधार)
    7 महाराष्ट्र शेतजमीन (कमाल जमीन धारणा) अधिनियम 1961 व त्या अंतर्गत नियम 1975 च्या अंमलबजावणीचे संनियंत्रण व पर्यवेक्षण करणे. 15 दिवस स.म.अ. सहाय्यक आयुक्त (भूसुधार)
    8 कोतवालाची पदे भरणे / मंजूरी इ. बाबत नियंत्रण ठेवणे व पत्रव्यवहार करणे. 15 दिवस स.म.अ. सहाय्यक आयुक्त (भूसुधार)
    9 महाराष्ट्र शेतजमीन (ज.धा.क.म.) अधिनियम 1961 सिलींग जमीन विक्रीबाबत सुधारणा नियम 1961 मधील नियम 12 (3) चे अ व ब नुसार जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करणे व मंजूरीसाठी शासनास सादर करणे. 30 दिवस स.म.अ. सहाय्यक आयुक्त (भूसुधार),विभागीय आयुक्त
    10 वक्फ अधिनियम 1995 प्रमाणे वक्फ जमीनीचे अधिकार अभिलेख,  वक्फ़ जमीनीवरील अतिक्रमण, इत्यादीबाबत आलेले सर्व पत्रव्यवहार व आवश्यक कार्यवाही करणे. 15 दिवस स.म.अ. सहाय्यक आयुक्त (भूसुधार)
    11 पश्चिम खानदेश मेवासी इस्टेट रेग्युलेशन 1949 अंतर्गत आयुक्त स्तरांवरील प्रारुप निवाडयास मंजुरी देणे बाबत कार्यवाही करणे. 15 दिवस स.म.अ. सहाय्यक आयुक्त (भूसुधार),विभागीय आयुक्त
    12 शासनाने विहीत केलेला कुळ कायदा अंमलबजावणी चा मासिक अहवालाबाबतची माहिती जिल्हाधिकारी यांचेकडुन घेऊन संकलित करणे व मासिक अहवाल शासनाकडे पाठविणे. 30 दिवस स.म.अ. सहाय्यक आयुक्त (भूसुधार)
    13 आदिवासींनी जमीनी प्रत्यार्पित करणे कायदा क्र.14/1975व 35/1974 अतर्गत आदिवासी जमीनींचे पुनर्विलोकन इ.बाबतचे केसेसवर कार्यवाही करणे.व पत्र व्यवहार करणे, तसेच वेळोवेळी शासनाने मागविलेली माहिती जिल्हाधिकारी यांचेकडून प्राप्त करुन घेऊन शासनास सादर करणे. 30 दिवस स.म.अ. सहाय्यक आयुक्त (भूसुधार),व विभागीय आयुक्त
    14 नागरिकांकडून आलेल्या जमिन महसूल अधिनियम, देवस्थान जमीनी, आदिवासी कायदा / कुळकायदा, तुकडेबंदी व जमिनीचे एकत्रिकरण अधिनियम, ई. अंतर्गतच्या जमीनींबाबतच्या तक्रारीं बाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुर्तता करुन घेणे व त्यासंबंधिचा पत्रव्यवहार करणे. 30 दिवस स.म.अ. सहाय्यक आयुक्त (भूसुधार),विभागीय आयुक्त
    15 तहसील कार्यालयातील कूळ खरेदीदाराकडून वसूल केल्या जाणा-या खरेदीच्या शेत जमीन न्यायाधिकरणाचे वैयक्तीक खातेवहीचे अंतर्गत लेखा परीक्षण करणे. (स्वीय लेख्यांची तपासणी) 10 दिवस स.म.अ.
    16 खंडकरी – शेतकरी यांना जमिन वाटप स.म.अ. सहाय्यक आयुक्त (भूसुधार),विभागीय आयुक्त
    17 महाराष्ट्र शासनाचे ई-फेरफार, ई-चावडी, ई-हक्क, ई-पिकपाहणी इ. योजनांची अंमलबजावणीचे नियंत्रण व समन्वय 15 दिवस स.म.अ. सहाय्यक आयुक्त (भूसुधार),विभागीय आयुक्त
    भुसूधार शाखेची ध्येय धोरणे कामाचे विस्तृत स्वरुप, उपलब्ध सेवा
    अ.क्र. कामाचे विस्तृत स्वरुप
    1 विविध भुसूधार कायद्याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे.
    2 महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम व इतर जमिन विषयक अधिनियमात नमुद शाखेशी संबंधित विभागीय आयुक्त म्हणून असणारी कामे करणे.
    3 आदिवासींनी धारण केलेल्या जमीनी बिगर आदिवासीकडेस बिनशेती प्रयोजनासाठी अथवा न्यायालयाचे हुकुमनाम्याप्रमाणे विक्रीने हस्तांतरण करणेस, भाडेपटटयाने   अथवा इतर कोणत्याही पध्दतीने हस्तांतर करणेस पूर्व मंजूरी देणेचे अधिकार म.ज.म.अ.1966 चे कलम 36-अ प्रमाणे जिल्हाधिकारी यांना आहेत. मात्र अशी परवानगी देणेपुर्वी शासनाची पुर्वमान्यता घेणे आवश्यक असते.
    4 आदिवासींनी धारण केलेल्या जमीन व बिगर आदिवासीने धारण केलेली जमीन मोबदला (अदलाबदल) करणेस पूर्व मंजूरी देणेचे अधिकार म.ज.म.अ.1966 चे कलम  36-अ प्रमाणे जिल्हाधिकारी यांना आहेत. मात्र अशी परवानगी देणेपुर्वी शासनाची पुर्वमान्यता घेणे आवश्यक असते.
    5 असे शासनाची पुर्व मान्यता देणेकामी प्रस्ताव शासनास सादर करावयाचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांमार्फत तपासून पाठविण्यात येतात.
    6 असे प्रस्ताव जिल्हाधिकारी / अपर जिल्हाधिकारी यांचेमार्फत तपासून प्राप्त होतात. शासनास प्रस्ताव सादर करताना जमिनीची शर्त, हस्तांतरणामुळे होणारे परिणाम, अशा जमिनी नव्या शर्तीच्या असल्यास अनर्जित रक्कम मुल्ल्यांकन, तसेच इतर कायद्यातील तरतुदीचा भंग होतो काय इ. तपासणे. त्रुटी आढळून आल्यास पुर्ततेकामी परत पाठविणे.
    7 मागणी केल्यानुसार हस्तांतर परवानगी देण्याचे प्रस्तावित केल्यास आदिवासी शेतकरी भूमीहिन होत नाही याची दक्षता घेणे.
    8 मागणी केल्यानुसार हस्तांतर परवानगी देण्याचे प्रस्तावित केल्यास आदिवासी शेतकऱ्यास प्रस्तावित हस्तांतरामध्ये जमिनीचे वास्तव बाजारमुल्य मिळेल याची दक्षता घेणे.
    9 हस्तांतरासाठी पुर्व परवानगी देतांना अशा हस्तांतरणामुळे शासनाचे हित व शासन नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेणे.
    10 ज्या प्रकरणात हस्तांतरणास परवानगी देणे शक्य आहे अशा प्रकरणात शक्य तेवढया लवकर शासनास प्रस्ताव सादर करणे.
    भुसुधार शाखेच्या कामाशी संबंधीत नियम व अधिनियम
    अ.क्र. भुअधिनियम व नियम
    1 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 व त्याखालिल नियम.
    2 महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड 1 त 5
    3 महाराष्ट्र अनुसुचित जमातींना जमिन प्रत्यर्पित करणे अधिनियम, 1974
    4 महाराष्ट्र जमीन महसूल (जनजातीच्या व्यक्तींनी जनजातीतर व्यक्तींकडे भोगाधिकार हस्तांतरीत्त करणे) नियम, 1975
    5 मुंबई शेतजमीन व कुळ वहिवाट अधिनियम 1948
    6 मुंबईचा जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947
    7 मुंबईचा जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत नियम 1947
    8 महाराष्ट्र शेतजमीन कमाल धारणा अधिनियम 1961
    9 महाराष्ट्र शेतजमीन (ज.धा.क.म.) खालिल नियम.
    10 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 व त्याखालील नियम.
    11 महाराष्ट्र शासकीय सेवक बदल्यांचे नियमन व शासकीय कामकाजात विलंब करण्यास प्रतिबंध करणे अधिनियम 2005
    12 वक्फ कायदा 1995 आणि नियम.
    13 मुंबई सेवा इनाम (समुदायासाठी उपयुक्त) निर्मूलन कायदा 1953
    14 बॉम्बे भिल्ल नाईक इनाम निर्मूलन कायदा 1955
    15 १९५८ चा बॉम्बे इनफेरियर व्हिलेज वतन निर्मूलन कायदा.
    16 महाराष्ट्र महसूल पटेल (वतन) निर्मूलन कायदा 1962
    17 १९५२ चा बॉम्बे पर्सनल इनाम निर्मूलन कायदा.
    18 बॉम्बे परगणा आणि कुलकर्णी वतन (निर्मूलन) कायदा 1950
    19 महाराष्ट्र जमीन हक्क कायदा (सुधारणा) कायदा 2000
    20 जमीन महसूलातून सूट (क्रमांक १) कायदा 1863
    भुसूधार कामाशी संबंधीत कामाशी महत्वाचे संबंधीत शासन निर्णय/ आदेश/ धोरणात्मक परिपत्रके
    अ.क्र. शासन निर्णय तारीख शासन निर्णयानुसार दिलेले विषय
    1 महाराष्ट्र सरकार महसूल आणि वन विभाग मंत्रालय, मुंबई ३२, परिपत्रक क्रमांक १०८३/सीआर-८८६/एल-५/ दिनांक 4 फेब्रुवारी 1983 जमीन अधिग्रहण रद्दीकरण कायदे – जमिनीचे हस्तांतरण अविभाज्यता आणि अविभाज्यता पुनर्रचनांच्या अटी.
    2 महाराष्ट्र सरकार महसूल आणि वन विभाग मंत्रालय, मुंबई ३२, परिपत्रक क्रमांक WTN-१०९९/ CR-२२९/L-४/ दिनांक 10 मार्च 2000 जमीन अधिग्रहण रद्दीकरण कायदे – जमिनीचे हस्तांतरण अविभाज्यता आणि अविभाज्यता पुनर्रचनांच्या अटी.
    3 शासन महसुल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचे कडील परिपत्रक क्र. वतन / १०९९/ प्र.क्र. २२३/ल-४ दिनांक 9 जुलै 2002 महाराष्ट्र अधिनियम क्र. २१/२००२ महान वतनी जमीनी व्यतिरिक्त नवीन व अविभाज्य शर्तीने दिलेल्या भोगवटादार वर्ग २ च्या इनामी/वतनी जमीनी भोगवटादार वर्ग १ च्या करण्याबाबत.
    4 अवर सचिव महसुल व वन विभाग मंत्रालय मुंबई आयसीएच-३२०१/प्र.क्र. ५/ ल-७ / दिनांक २७/११/२००६ महाराष्ट्र शेतजमीन ( ज.धा.क.म. ) अधिनियम १९६१ अन्वये मिळालेल्या जमीनीची विक्री परवानगी बाबत
    5 शासन पत्र क्र. आदिवासी -१००९/ प्र.क्र. ३२३/ल-१ दिनांक 14 फेब्रुवारी 2012 महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६च्या कलम ३६ व ३६ अ व त्याच प्रमाणे महाराष्ट्र अनुसूचित जमातीना जमीन प्रत्यार्पित करण्यासाठी अधिनियम १९७४ च्या कलम ३ व ४ मध्ये असलेली ३० वर्षाची कालमर्यादा संपुष्टात आल्याने ती पुर्वलक्षी प्रभावाने वाढविण्याबाबत
    6 महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र.लोआप्र -२००९/ प्र.क्र. २३८/ल-६ दिनांक 17 मार्च 2012 महाराष्ट्र जमीन महसुल नियमपुस्तिका खंड ४ मधील गाव नमुना नं. १(क) मध्ये सुधारणा करणेबाबत.
    7 शासन पत्र संकीर्ण – २१०/ १८१२/ ३०९ ( भाग -२)/ ल ९ दिनांक २६/०८/२०१३ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ३६ अ मधील तरतुदीनुसार आदिवासी व्यक्तींच्या जमिनी बिगर आदिवासी व्यक्तींना अकृषिक प्रयोजनार्थ हस्तांतरीत करण्याबाबत
    8 शासन महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील निर्णय क्रमांक केओटी – २१२/ प्र.क्र. ४३२ / ई-१० दिनांक 5 सप्टेंबर 2013 कोतवाल भरतीच्या दिनांक ०७/०५/१९५९ च्या सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्याबाबत.
    9 सन २०१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ०१ दि. 7 फेब्रुवारी 2014 महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम हैद्राबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९५० आणि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन ( विदर्भ प्रदेश) अधिनियम यामधील सुधारणा
    10 शासन महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील परिपत्रक टीएनसी -०४/२०१३/ प्र.क्र. १९६/ज-१ दिनांक 7 मे 2014 कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियमातील शेतजमीन खरेदी / विक्री अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या पुर्वपरवानी विषयक तरतुदीतील सुधारणेच्या अंमलबजावणीकरीता सुचना कलम ४३.
    11 शासन महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील परिपत्रक टीएनसी -०४/२०१३/ प्र.क्र. १९६/ज-१ दिनांक 16 जुलै 2014 कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियमातील शेतजमीन खरेदी / विक्री अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या पुर्वपरवानी विषयक तरतुदीतील सुधारणेच्या अंमलबजावणीकरीता सुचना कलम ४३.
    12 भूसुधार-२/ वशी/२७४४०/२०१५ दिनांक २५/६/२०१५ अधिकार अभिलेख संबंधी तक्रारीचे निराकरण करणेबाबत.
    13 सन २०१६ चे विधानसभा विधेयक क्र. २० दिनांक ७/५/२०१६ महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम यामध्ये सुधारणा ( कलम 84 व 84 कक )
    14 सन 2016 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 1 दिनांक 1 जानेवारी 2016 महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम यामध्ये सुधारणा ( कलम 63)
    15 शासन महसूल व वन विभाग ,मंत्रालय मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्र. वक्फ 2015/ प्र.क्र. 78/ज -1अ दिनांक 13 एप्रिल 2016 महाराष्ट्र राज्यातील वक्फ मालमत्तांच्या गाव नमुना नं. 7/12 च्या उताऱ्यावर तसेच नागरी भागातील वक्फ मिळकतींच्या अधिकार अभिलेखांमध्ये केवळ संबंधित वक्फ संस्थेच्या नावाची नोंद घेणे आणि इतर हक्क सदरी वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार अशी नोंद घेणेबाबत सर्वसमावेशक सुचना
    16 शासन महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्र. अविवि /२००९ / प्र.क्र. १०५/ कार्यासन -४ दिनांक 7 डिसेंबर 2016 वक्फ अधिनियम, १९९५ च्या कलम ४(६) मधील सुधारित तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्यातील वक्फ संस्थांचे / मालमत्तांचे दुसरे (Second) सर्वेक्षण करणेबाबत.
    17 शासन अधिसूचना महसूल व वन विभाग ,मंत्रालय मुंबई यांचेकडील क्र. जमीन -2016/ प्र.क्र. 329/ ज-1 दिनांक 13/4/2017 राज्य शासनाच्या कोणत्याही विभागाकडून राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त सार्वजिनिक प्रकल्पासाठी आदिवासी व्यक्तीची जमीन वाजवी भरपाईने थेट खरेदी करणेबाबत.
    18 सन 2018 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 58 दि. 7 सप्टेंबर 2017 महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम यांत आणखी सुधारणा करण्याबाबत.
    19 सन 2018 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 56 दि. 13 ऑगस्ट, 2018 महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम हैद्राबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1950 आणि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन ( विदर्भ प्रदेश ) अधिनियम यामधील सुधारणा ( कलम 63 एक-अ)
    20 शासन परिपत्रक क्र. डिईव्ही -2015/ प्र.क्र. 51/ ज-1अ दि. 6 नोव्हेंबर, 2018 राज्यातील देवस्थान जमिनीची तपासणी तसेच या जमिनी बेकायदेशीर हस्तांतरीत झाल्या असल्यास पुर्ववत देवस्थान नावे करणे बाबत.
    21 सन 2019 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 16 दि. 05 आगस्ट 2019 महाराष्ट्र परगणा व कुळकर्णी वतने नाहीशी करण्याबाबत अधिनियम, महाराष्ट्र ( समाजास उपयुक्त ) सेवा इनामे रद्द करण्याबाबत अधिनियम , महाराष्ट्र विलीन प्रदेश किरकोळ दुमाला वहिवाटी नाहीशा करण्याबाबत अधिनिमय, महाराष्ट्र गावची कनिष्ठ वतने नाहिशी करण्याबाबत अधिनियम आणि महाराष्ट्र मुलकी पाटील ( पद रद्द करणे ) अधिनियम 1962 यामध्ये सुधारणा करण्याकरीता अध्यादेश
    22 सन 2024 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 14, दि. 15 ऑक्टोबर, 2024 महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत (सुधारणा) अध्यादेश, 2024