बंद

    करमणूक शुल्क शाखा

    करमणूक शुल्क शाखेचा उद्देश

    • मुंबई (महाराष्ट्र) करमणूक शुल्क अधिनियम 1923 अन्वये जिल्ह्यातील कामकाजावर नियंत्रण व पर्यवेक्षणाची जबाबदारी..
    • विभागातील करमणुक शुल्क वसुली पूर्ण करणेसाठी पाठपूरावा करणे.
    • शासनाने वेळोवेळी निर्गत केलेले स्थायी आदेशाची अंमलबजावणी करणे.
    • महालेखापाल यांचेकडील प्रलंबित परिच्छेदामधील वसुली व प्रलंबित परिच्छेद स्वीकृतीकामी पाठपूरावा करणे.
    • मुंबई (महाराष्ट्र) करमणूक शुल्क अधिनियम 1923 चे कलम 10 अ नुसार अपीलांची सुनावणी घेणे.
    • मुंबई (महाराष्ट्र) करमणूक शुल्क अधिनियम 1923 चे कलम-8 नुसार करमणूक केंद्रामध्ये प्रवेश करणे.

    तथापि, महाराष्ट्र शासन, असाधारण राजपत्र भाग चार दि. 29 मे, 2017, महाराष्ट्र वस्तू व सेवा करविषयक कायदे अधिनियम 2017 मधील प्रकरण तीन, महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम याची सुधारणा अन्वये करमणूक शुल्क अधिनियमात “जिल्हाधिकारी” व “आयुक्त” या शब्दांऐवजी “स्थानिक प्राधिकरण” (महानगर पालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, कटक मंडळे) असा बदल करण्यात आला आहे.

    तसेच महाराष्ट्र शासन, असाधारण राजपत्र भाग चार-ब, दि. 01 जुलै, 2017 अन्वये करमणूकीवर वस्तू व सेवा कर लागू झाल्याने महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम, 1923 मधील कलम 3 नुसार बसविण्यात येणारा करमणूक शुल्क भरण्यापासून महाराष्ट्र शासनाने पुढील आदेशापर्यंत किंवा 15 सप्टेंबर, 2017 यापैकी जे अगोदर घडेल, तोपर्यंत सूट दिली होती. तद्नंतर महाराष्ट्र शासन, राजपत्र भाग चार-ब, दि. 22 नोव्हेंबर 2023 महसूल व वन विभाग आदेश क्र. ईएनटी-2017/प्र.क्र.111/टी-1, दिनांक 1 जुलै, 2017 अन्वये महाराष्ट्र करमणूक शुल्क अधिनियम, 1923 मधील कलम 3 नुसार आकारण्यात येणाऱ्या करमणूक शुल्क भरण्यापासून दि. 15 सप्टेंबर, 2017 पर्यंत दिलेली सूट ही दि. 30 सप्टेंबर, 2026 पर्यंत सुरु ठेवण्यात आलेली आहे.

    त्यामुळे सद्यस्थितीत करमणूक शुल्क शाखेमधून विभागातील पाच जिल्ह्यांची प्रलंबित असलेली करमणूक शुल्क वसुली, न्यायालयीन प्रकरणे, अर्धन्यायिक प्रकरणे, महालेखाकार कार्यालयाकडील प्रलंबित लेखा परिच्छेदांचे अनुपालन व अंतर्गत लेखा पथकाकडील प्रलंबित लेखा परिच्छेद इत्यादी करमणूक शुल्क विषयक कामकाज केले जाते.

    करमणूक शुल्क शाखेचे उद्दिष्ट व कार्य

    मुंबई (महाराष्ट्र) करमणूक शुल्क अधिनियम 1923 नुसार बहुपडदा, एकपडदा, फिरती चित्रपटगृह, व्ही.डी.ओ. केंद्र, मनोरंजन उद्याने, जलक्रिडा, पुलगेम पार्लर, बोलींग ॲली, नृत्यबार, डिस्कोथेक, व्ही.डी.ओ. खेळ, केबल टी.व्ही.जोडण्या, डी.टी.एच. जोडण्या इ. करमणूक केंद्रांना दि. 30 जून, 2017 पावेतो आकारण्यात आलेल्या करमणूक शुल्काची प्रलंबित वसुली केली जाते.

    WhatsApp Image 2025-03-18 at 12.47.23 PM (1)

    विभागीय आयुक्त कार्यालयातील करमणूक शुल्क शाखेत सह आयुक्त (करमणूक शुल्क) हे शाखा प्रमुख म्हणून कार्यरत असून शाखेत दोन करमणूक शुल्क निरिक्षक, एक महसूल सहायक, एक शिपाई व एक वाहन चालक अशी एकूण सहा पदे मंजूर आहेत.

    नाव पदनाम ईमेल पत्ता फोन
    डॉ. प्रवीण गेडाम विभागीय आयुक्त, नाशिक divcom[dot]nashik[at]maharashtra[dot]gov[dot]in विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक विभाग, नाशिक रोड 0253-2461909
    डॉ. राणी ताटे सह आयुक्त (करमणूक शुल्क), नाशिक entnsk[at]rediffmail[dot]com विभागीय आयुक्त कार्यालय (करमणूक शुल्क शाखा) नाशिक विभाग, नाशिक रोड 0253-2462401 ते 05