नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाविषयी
नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण (NTKMA) हे महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले एक विशेष शासकीय प्राधिकरण असून, नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या नियोजन, समन्वय व देखरेखीचे कार्य या प्राधिकरणामार्फत करण्यात येते.
एनटीकेएमए ही मुख्य नोडल संस्था असून, जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक मेळाव्यांपैकी एक असलेल्या कुंभमेळ्याचे सुरळीत आयोजन करण्याची जबाबदारी या प्राधिकरणावर आहे. या प्राधिकरणाच्या कार्यामध्ये पायाभूत सुविधा विकास, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन, सुरक्षा व संरक्षक व्यवस्था, वाहतूक व गतीशीलतेचे नियोजन, डिजिटल सक्षमकरण, भाविकांना सुविधा उपलब्ध करून देणे तसेच विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय साधणे या बाबींचा समावेश आहे.
हे प्राधिकरण स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य व केंद्र शासनाचे विभाग, स्वयंसेवी संस्था, अखाडे व इतर संबंधित भागीदार यांच्या सहकार्याने लाखो भाविक व पर्यटकांना सुरक्षित, सर्वसमावेशक व समृद्ध असा अनुभव देण्यासाठी कार्य करते.