महसूल जमीन शाखा
महसूल जमीन शाखेची ध्येय धोरणे कामाचे विस्तृत स्वरुप, उपलब्ध सेवा
- शासकीय जमिनीवरील कृषिक / अकृषिक प्रयोजनार्थ झालेली अतिक्रमणे नियमानुकूल करणे तसेच काढून टाकणे बाबत प्रस्ताव कार्यवाही करणे
- शासकीय जमिनीचे कब्जा हक्क रकमेवर / भोगाधिकार मुल्यरहित महसूल मुक्त किंमतीवर विवरणास मंजूरी प्रस्ताव
- शासकीय वसूली अ.ब.क प्रपत्रातील माहिती संकलीत करुन शासनास सादर करणे
- गौण खनिजाच्या अनुषंगाने असलेल्या तक्रारींबाबत कार्यवाही व शासनाचे संबंधीत विषयाबाबतचे पत्रव्यवहार करणे व शा.नि.दि.16 फेब्रुवारी 2024 नुसार नियंत्रण ठेवणे.
-
भारतीय वन अधिनियम 1929 अन्वये वन जमिनीच्या बदल्यात उपलब्ध करुन दिलेल्या वन जमिनीस संरक्षित वने व राखीव वनांचा दर्जा देण्यासाठी शासनाची मंजूरी घेणे व अधिसूचना प्रसिध्द करणे
- महसूल खात्यातील वन जमिनी वन खात्याकडे वर्ग करण्याचा कामाचा आढावा
- महालेखाकार, नागपूर यांचेकडील महसूली जमा अहवाल/ परिच्छेदांची पूर्तता करुन घेणे
-
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनांची माहिती जिल्हाधिकारी यांचेकडून दरमाह प्राप्त करणे व त्यासंबंधीचा जिल्हाधिकारी व शासनस्तरावर पत्रव्यवहार तसेच त्यासंबंधीच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या तक्रारीचा निपटारा करणे
-
भूमिहीन दारिद्रयरेषेखालील आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजनांची माहिती जिल्हाधिकारी यांचेकडून दरमाह प्राप्त करणे व त्यासंबंधीचा जिल्हाधिकारी व शासनस्तरावर पत्रव्यवहार तसेच त्यासंबंधीच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या तक्रारीचा निपटारा करणे
- नागरी विभागातील अकृषिक साऱ्याची प्रमाणदर निश्चिती करण्याच्या संदर्भात आवश्यक ती माहिती शासनास सादर करणे
- जमिन विषयक तक्रारी अर्जाचा निपटारा करणे
- शासनाकडून सरकारी जमिनी विषयक मागविण्यात येणारी विविध प्रकारची माहिती जिल्हाधिकारी यांचेकडून संकलित करुन शासनास सादर करणे
-
जिल्हाधिकारी /अपर जिल्हाधिकारी /मुख्य कार्यकारी अधिकारी/ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प यांची मासिक बैठकी बाबत विषय सुची तयार करणे माहिती संकलीत करुन विभागीय आयुक्तांना टिपणी सादर करणे. वेळोवेळी होणाऱ्या बैठकांची अचुक माहिती तयार करुन बैठकीस टंकलिखीत करुन सादर करणे
- संजय गांधी निराधार अनुदान योजना/ इंदिरा गांधी भूमिहीन शेतमजूर महिला अनुदान योजना आस्थापना अनुदान मागणी व वाटप बाबत कामकाज करणे
-
विभागीय आयुक्त कार्यालयातील लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करणे त्या अनुषंगाने माहिती शासनास सादर करणे ,प्रेसनोट काढणे अर्ज संबंधीत कार्यालयास / शाखेस चौकशी अहवालासाठी पाठविणे प्राप्त चौकशी अहवालानुसार मा. विभागीय आयुक्तांना टिपणी सादर करणे. लोकशाही दिन / माहितीच्या अधिकाराखालील प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करणे अर्जदारास उत्तर देणे.
- निर्णय झालेल्या प्रकरणांची निंदणी करुन कागदपत्रे अ,ब.क,ड प्रमाणे वर्गवारी करुन अभिलेख कक्षात पाठविणे व ड पेपर नष्ट करणे
- पाणी टंचाई, चारा टंचाई,
- टँकर्स / बैलगाडयाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे,
- टंचाई कृति आराखडयाचे नियंत्रण करुन प्रगतिचा आढावा घेवून अहवाल शासनास सादर करणे, टंचाई कृति आराखडयातील विविध उपाय योजनांना मंजूरी देणे,
- जनावरांच्या छावण्यांबाबत,
- नैसर्गिक आपत्ती, (माहे जून ते सप्टेंबर अखेर – साप्ताहिक अहवाल)
- दैनंदिन पर्जन्यमान (माहे जून ते सप्टेंबर अखेर प्रति वर्षी)
- अतिवृष्टी व पूर, गारपीट, पिकांच्या नुकसानीचा अहवाल शासनास सादर करणे,
- खरीप हंगामी, सुधारित हंगामी, अंतिम पैसेवारी जाहीर करणेबाबत,
- रब्बी हंगामी, सुधारित हंगामी, अंतिम पैसेवारी जाहीर करणेबाबत,
- शेतकरी आत्महत्या विषयक कामकाज
- आपत्कालीन व्यवस्थापन योजने अंतर्गत विभागीय नियंत्रण कक्ष स्थापित करणेबाबत व प्राप्त अहवाल शासनास वेळोवेळी सादर करणे,
- नैसर्गिक आपत्ती आपदग्रस्तांना दिलेल्या मदतीच्या माहितीचे संकलन करणे व प्राप्त अहवाल शासनास वेळोवेळी सादर करणे,
- उपयोगिता प्रमाणपत्रे (मुख्यलेखाशिर्ष 22450093)
- विधीमंडळ तारांकीत / अतारांकीत प्रश्ने, लक्षवेधी सुचनांबाबत माहितीचे संकलन व शासनास अहवाल सादर करणे,
- धरणातील पाणीसाठा,
- जिल्हाधिकारी, यांचेकडून आपत्तकालीन व्यवस्थापन आराखडा तयार करुन घेणे, केंद्रीय समितीच्या दौऱ्याचे व्यवस्थापन.
अधिक माहितीसाठी खालील पीडीएफ डाउनलोड करा