बंद

    विभागीय महसूल प्रबोधिनी

    विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, नाशिक या संस्थेने विहीत केलेली कार्ये कर्तव्य यांचा तपशिल

    नाशिक येथील प्रादेशिक प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची संपर्क माहिती आणि तपशील
    Sr No.
    1 संस्थेचे नांव विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, नाशिक
    2 पत्ता विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक रोड
    3 संस्था प्रमुख संचालक, विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, नाशिक
    4 संस्थेच्या शासकीय विभागाचे नांव सामान्य प्रशासन विभाग
    5 कोणत्या मंत्रालयीन खात्याच्या अधिनस्त सामान्य प्रशासन विभाग
    6 कार्यक्षेत्र भौगोलिक कार्यानुरुप नाशिक विभाग
    7 विशिष्ट कार्ये गट ब व गट क या संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेणे.
    8 संस्थेचा दुरध्वनी क्रमांक 0253-2453366

    संस्थेचा संरचनात्मक तक्ता

    संस्थेचा संरचनात्मक तक्ता

    विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, नाशिक या संस्थेचे ध्येय धोरणेकामांचे विस्तृत स्वरुप, उपलब्ध सेवा

    1. नाशिक महसूल विभागात कार्यरत असलेल्या महसूल क्षेत्रीय स्तरावरील विविध संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी “नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक” ही संस्था स्थापन करण्यास दि.10/8/2006 च्या शासन पत्रान्वये मान्यता देण्यात आली.

    2. उपरोक्त बाबत सर्वंकष आढावा घेऊन, नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक या संस्थेकरीता शासन निर्णय, दि.15/11/2011 अन्वये एकूण 08 पदांची निर्मिती करण्यात आली.

    3. राज्य शासन सेवेत सर्व स्तरावर कार्यक्षमता वाढवून गतीमान प्रशासन होण्याकरीता राज्यातील सर्व कर्मचारीवृंद यांना प्रशिक्षण देण्याची असलेली आवश्यकता तसेच आर्थिक, सामाजिक, राजकीय व तांत्रीक बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाणे व प्रशासनामध्ये बदलासाठी आवश्यक असणारी लवचिकता साध्य करणे, याबाबत देखील सर्व स्तरावर प्रशिक्षण देण्याची गरज विचारात घेऊन, शासन निर्णय दि.23/9/2011 अन्वये “महाराष्ट्र राज्याचे प्रशिक्षण धोरण” निश्चित करण्यात आले.

    4. विभागीय मुख्यालयाच्या स्तरावर प्रशिक्षण विषयक कामकाज पार पाडण्यासाठी शासन निर्णय, दि.14/10/2013 अन्वये नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक या संस्थेस विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित करण्यात आले.

    5. यशदा, पुणे यांच्या अंतर्गत व मार्गदर्शनाखाली नाशिक महसूल विभागातील राज्य शासकीय गट-ब संवर्गातील अधिकारी आणि गट-क संवर्गातील कर्मचारी यांच्याकरीता पायाभूत, पदोन्नती पश्चात व उजळणी या स्वरुपाचे प्रशिक्षण वर्ग या संस्थेत आयोजित करण्यात येतात.

    6. या संस्थेमध्ये गट-ब चे अधिकारी व गट-क चे कर्मचाऱ्यांकरीता राज्य प्रशिक्षण धोरण (STPEA)अंतर्गत आयोजित करण्यात येणारे प्रशासकीय प्रशिक्षण कार्यक्रम (महाराष्ट्र नागरी सेवा नियम, वित्त विषयक बाबी, प्रशासकीय बाबी व कौशल्य विकास इत्यादी विषयांबाबतचे प्रशिक्षण).

    7. विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमध्ये खालीलप्रमाणे प्रशिक्षण घेतले जातात.

    प्रशिक्षणाचे प्रकार
    अ.क्र. क्रिया दिवस
    1 पायाभूत प्रशिक्षण 12 दिवस
    2 उजळणी प्रशिक्षण 5 दिवस
    3 पदोन्नती पश्चात गट-ब 12 दिवस, गट क- 12 दिवस
    4 पदोन्नतीनंतरचे 6 दिवस
    5 अभिमुख करणे 1 दिवस
    6 महापार 1 दिवस

    विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, नाशिक येथील आकृतीबंधानुसार मंजूर पदांच्या जबाबदा-या खालीलप्रमाणे आहेत

    पदांची कर्तव्य व जबाबदा-या
    अ.क्र. पदांचे पदनांव पदांची कर्तव्य व जबाबदा-या
    1 संचालक वर्ग -1
    1. प्रशिक्षण संस्थेसाठी प्रशासकीय प्रमुख म्हणून काम पहाणे.
    2. संस्थेत चालणा-या सर्व कामांवर देखरेख ठेवणे.
    3. प्रशिक्षण कार्यक्रम घेणे.
    4. प्रशिक्षणांची सत्रे 50 घेणे.
    5. प्रशिक्षणांची विविध स्वरुपाची माहिती गोळा करणे, माहितीचे मुल्यमापन करणे, विविध संशोधन कार्यक्रमांसाठी सादरीकरणे तयार करणे.
    2 निबंधक तथा सहायक प्राध्यापक वर्ग -1 सर्व प्रशासकीय कामकाजाचे पर्यवेक्षण व व्यवस्थापन करणे व सहायक प्राध्यापक यांचे संबंधीत सर्व कामकाज .
    3 सहायक प्राध्यापक वर्ग – 1
    1. संस्थांच्या कामाकाजाची पाहणी करन प्रशिक्षण गरजा शोधणे व त्याप्रमाणे आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाचा मसूदा तयार करणे.
    2. प्रशिक्षण कार्यक्रम विहीत कालावधीत पार पाडण्याच्या दृष्टीने व्यवस्था करणे.
    3. संबंधीत कार्यालयांकडून नामनिर्देशनासाटी पत्रव्यवहार करणे.
    4. प्रशिक्षणासाठी वाचन साहित्य तयार करणे.
    5. प्रशिक्षण सत्राचे व्यवस्थापन करणे.
    6. संचालक यांनी वेळोवेळी दिलेल्या जबाबदा-या पार पाडणे.
    7. प्रशासकीय नियंत्रण ठेवणे.
    8. प्रशिक्षणांचे विश्लेषण व वर्गीकरण करुन तत्संबंधीत माहिती ठेवणे.
    9. प्रशिक्षणर्थीची अभिप्राय विचारात घेऊन प्रशिक्षाचे कार्यवृत्त तयार क.
    10. प्रशिक्षणाची सत्रे 80 घेणे.
    11. प्रशिक्षणाची विविध स्वरुपाची माहिती गोळा करणे, माहितीचे मुल्यमापन करणे, विविध संशोधन कार्यक्रमांसाठी सादरीकरणे तयार करणे.
    4 सहायक लेखाधिकारी वर्ग -3
    1. लेखाविषयक कामकाजावर वित्तीय सल्लागार म्हणून नियंत्रण ठेवणे.
    2. अर्थ संकल्पीय तरतुदीबाबत अंदाजपत्रके तयार करणे.
    3. संस्थासाठी आवश्यक असलेले अनुदान शासनाकडून प्राप्त करुन घेणे.
    4. संस्थेस प्राप्त अनुदानाचा हिशोब ठेवणे.
    5. वरिष्ठ अधिका-यांनी वेळोवेळी दिलेल्या जबाबदा-या पार पाडणे.
    5 वसतीगृह तथा आवार व्यवस्थापक वर्ग -3
    1. वसतीगृह व प्रशासकीय तसेच इतर कार्यालयीन इमारतीचे व भोजन कक्षाचे व्यवस्थापन करणे.
    2. रहिवासी प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी यांना सुरक्षित आणि आरोग्यजनक वातावरण उपलब्ध करुन देणे.
    6 प्रशासकीय सहायक वर्ग -3
    1. प्रशिक्षणार्थ्यांच्या कार्यालयाशी व नामनिर्देशित व्यक्ती सोबतचा पत्र व्यवहार करणे.
    2. प्रशिक्षणार्थ्यांच्या उपस्थितीबाबत नोंदी ठेवणे व प्रशिक्षण संपल्यावर त्यांना कार्यमुक्त करणे.
    3. प्रशिक्षणबाबतचे प्रमाणपत्र तयार करुन त्यांचे वितरण करणे.
    4. प्रशिक्षणार्थ्यांच्या निवास, पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता व भोजनाच्या व्यवस्थेकडे लक्ष देणे.
    5. आवक/जावक टपालाची नोंद घेणे.
    6. कार्यालयीन अभिलेख्याचे व्यवस्थापन करणे, संस्थेतील अभिलेख व दप्तराची वर्गवारी करुन ती व्यवस्थित ठेवणे.
    7. संचालक यांना दैनंदिन कामात मदत करणे.
    8. सत्र संचालकाला त्यांच्या प्रशिक्षण विषयक कामात मदत करणे.
    7 कार्यालयीन अधिक्षक/स्टेनोग्राफर वर्ग 3
    1. बैठका अहवाल पत्रे यांच्या नोंदी घेणे, टंकलेखन करणे.
    2. दूरध्वनीविषयक कामे करणे.
    3. बैठका दौ-याबाबतचे सर्व पत्रव्यवहार करणे व त्यांचा अभिलेख ठेवणे.
    4. लघूलिपीत नोंदी घेऊन टंकलेखन करणे.
    5. सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल/ सेवाविषयक अभिलेख ठेवणे.
    6. कनिष्ठ कर्मचा-यांच्या दैनंदिन कामकाजावर ‍नियंत्राण ठेवणे व त्यांना मार्गदर्शन करणे.
    7. शासकीय स्तरावर मागविण्यात आलेली माहिती तत्परतेने उपलब्ध करुन देणे.
    8 ग्रंथपाल वर्ग -3
    1. वाचनीय साहित्यांची नोंदवही ठेवणे.
    2. पुस्तकांचे वर्गीकरण/ तालिकीकरण करणे.
    3. पुस्तकांची सुची तयार करणे.
    4. वाचकांना संदर्भ सेवा उपलब्ध करुन देणे.
    5. शासनमान्य ग्रंथालयांची सर्व माहिती ठेवणे.
    6. शासनमान्य पुस्तकांना मंजूर करावयाचे अनुदानाविषयक प्रस्ताव तयार करणे.
    9 चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्ग -4
    1. कार्यालयातील स्वच्छता ठेवणे, टपाल वाटप करणे, अधिकारी/कर्मचारी यांनी सोपविलेली कामे करणे.
    2. कार्यालयाचे व शासकीय दस्ताऐवजाचे रात्रीच्या वेळी व सुटटीच्या दिवशी संरक्षण करणे.
    3. संस्थेतील तसेच संस्थेच्या बाहेरील आवारातील सर्व साफसफाई करणे.