बंद

    महसूल आस्थापना शाखा

    महसूल आस्थापना शाखेची ध्येय धोरणे कामाचे विस्तृत स्वरुप, उपलब्ध सेवा

    1. सरळ सेवा व पदोन्नतीने भरण्याच्या पदांच्या माहिती शासनास सादर करणेचे कार्यवाही.
    2. उप जिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्या सर्वसाधारण बदल्यांची माहिती शासनास सादर करणेचे कार्यवाही.
    3. अधिका-यांना पदोन्नतीचा मानीव दिनांक देणेबाबत.
    4. उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नतीसाठी आवश्यक ती माहिती, गोपनीय अहवाल, विभागीय चौकशी इ. ची माहिती सादर करणे.
    5. अधिका-यांचे जात वैधता प्रमाणपत्राची माहिती सादर करणे बाबत.
    6. सरळसेवेत / पदोन्नतीने नियुक्त झालेल्या अधिका-यांची जेष्ठता यादीसाठी आवश्यक असणारी माहिती वेळेवर सादर करणेबाबत.
    7. अप्पर जिल्हाधिकारी / उपजिल्हाधिकारी यांचे गोपनीय अहवाल पुर्नविलोकनासाठी पाठविणेबाबत.
    8. उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार यांचे मुल्यांकन अहवाल व विहीत नमुन्यातील माहिती शासनास सादर करणेबाबत व नायब तहसिलदार संवर्गातील गोपनीय अहवालांचे जतन व संस्करण.
    9. उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार यांचे हजर झाल्याची तारीख शासनास सादर करणेबाबत.
    10. राज्य सेवा पुर्व परीक्षेसाठी रिक्त पदांसंबंधी मागणीपत्र शासनास सादर करणेबाबत.
    11. रिक्त पदांची माहिती वेळोवेळी शासनास सादर करणेबाबत. (नागरी यादी)
    12. शासनाकडेस प्राप्त झालेल्या तक्रारी संबंधात शासनाने मागविलेले चौकशी अहवाल सादर करणेबाबत.
    13. अधिका-यांचे विभागीय चौकशी संदर्भात मागणी केलेली माहिती सादर करणे.
    14. निलंबित अधिका-यांना पुर्ननियुक्तीबाबतच्या प्रस्तांवावर अहवाल सादर करणे. अधिका-यांच्या तक्रारी संदर्भात शासनाकडेस प्राप्त झालेल्या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबत अभिप्राय सादर करणे.
    15. माहितीचा अधिकारान्वये मागविलेली माहिती शासनास सादर करणे.
    16. तारांकीत प्रश्न / अतारांकीत प्रश्न / कपात सुचना इ. ची माहिती शासनास सादर करणे.
    17. लोकसभा आश्वासन पुर्तीबाबतची माहिती शासनास सादर करणे.
    18. पदांचा आढाव्याबाबतची माहिती शासनास सादर करणे.
    19. पदे रद्द करणे / नविन पदे निर्मितीबाबतचा अहवाल शासनास सादर करणे.
    20. उच्च न्यायालयीन प्रकरणातील अभिप्राय/प्रतिज्ञापत्र शासनास सादर करणे.
    21. सेवानिवृत्त होणा-या अधिका-यांची माहिती शासनास सादर करणे.
    22. परिविक्षाधीन अधिका-यांची परिविक्षाधीन कालावधीवर नियंत्रण ठेवुन शासकीय सेवा नियमित करणेबाबतची माहिती शासनास सादर करणे.
    23. महसुल अर्हता परिक्षा व विभागीय दुय्यम सेवा परिक्षांचे आयोजन, संनियंत्रण व निकाल घोषीत करणे.
    24. गट क संवर्गातील निलंबित कर्मचा-यांच्या निलंबनाचा आढावा घेवुन पुन:स्थापनेबाबत उचीत निर्णय घेणे.
    25. नायब तहसिलदार संवर्गाची जेष्ठता यादी तसेच अव्वल कारकुन / मंडळ अधिकारी संवर्गाची विभागाची एकत्रित जेष्ठता यादीचे संस्करण व जतन.
    26. अव्वल कारकुन / मंडळ अधिकारी संवर्गातुन नायब तहसिलदार संवर्गात तसेच नायब तहसिलदार संवर्गातुन तहसिलदार संवर्गात द्यावयाच्या पदोन्नती कामी विभागीय पदोन्नती समितीची बैठक घेणेबाबत कार्यवाही.

    अधिक माहितीसाठी खालील पीडीएफ डाउनलोड करा

    महसूल आस्थापना शाखेची माहिती मराठीत [पीडीएफ 311 केबी]