अपील शाखा
अपील शाखेचा तपशिल
- शाखेचे नांव:- अपील शाखा
- पत्ता:- विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक
- कार्यालय प्रमुख:- अपर विभागीय आयुक्त
- शासकीय विभागाचे नावं:- महसूल व वनविभाग
- कोणत्या मंत्रालयातील खात्याचा अधिनस्त:- महसूल व वनविभाग
- कार्यक्षेत्र:- विभागीय कार्यक्षेत्र (नाशिक,धुळे,नंदुरबार,जळगांव,अहिल्यानगर या पाच जिल्हयांचे कार्यक्षेत्र)
- विशिष्ट कार्ये:-
- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247-अपील, कलम 257-पुनरिक्षण, कलम 258- पुनर्विलोकन.
- महाराष्ट्र ग्रामपोलीस (नेमणुक,परिश्रमीक, भत्ते व सेवेच्या शर्ती) आदेश 1968 चे परिच्छेद क्र. 12 नुसार अपील.
- महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा 1999 चे कलम 44 नुसार अपील.
- कार्यालयातील दुरध्वनी क्रमांक:- 0253-2462401
- ई-मेल:- crunsk-divcom[at]mah[dot]gov[dot]in
- संकेतस्थळ:- www.eqjcourts.gov.in
पदनिहाय रचना/तक्ता
कामाची कार्यपध्दती
अपर विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांच्या न्यायालयात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 अपील, 257 पुनरिक्षण, 258 पुनर्विलोकन, महाराष्ट्र भाडे नियंत्रण कायदा 1999 चे कलम 44 नुसार अपील, महाराष्ट्र ग्रामपोलीस (नेमणुक,परिश्रमीक, भत्ते व सेवेच्या शर्ती) आदेश 1968 चे परिच्छेद क्र. 12 नुसार अपील दाखल होतात.
अपील, पुनरिक्षण, पुनर्विलोकन दाखल करुन घेतांना प्रथम अशा अर्जाची खालील मुद्यांवर छाननी केली जाते.
-
अपील अर्जाला रु.50/- चे कोर्ट फी स्टॅम्प.
-
वकीलपत्रासाठी व स्थगिती आदेशाच्या अर्जाला रु. 10/- चे कोर्ट फी स्टॅम्प.
-
सर्व सामनेवाले यांचेसाठी अपिल / पुनरिक्षण / पुनर्विलोकन अर्ज याची प्रत.
-
ज्या निर्णयाविरुध्द अपिल/पुनरिक्षण / पुनर्विलोकन अर्ज दाखल केला आहे त्या निर्णयाची साक्षांकीत प्रत.
-
उपविभागीय अधिकारी / तहसिलदार/ मंडळ अधिकारी यांचे आदेश झालेले असल्यास त्यांची साक्षांकीत प्रत.
-
वाद मिळकतीचा गा.न.नं. 7/12 (15 दिवसापेक्षा जुना नसावा).
-
अपील दाखल करण्यास विलंब झालेला असल्यास, विलंब माफ करण्याबाबत स्वतंत्र अर्ज.
-
स्थगिती अर्ज (आवश्यकता असल्यास).
-
स्थगिती अर्ज असल्यास कॅव्हेट अर्ज दाखल आहे काय? याची शहानिशा केली जाते.
-
मा.अपर विभागीय आयुक्त यांचेकडेस दाखल करण्यात आल्यानंतर सुनावणीची तारीख निश्चित करण्यात येते.
-
सर्व संबंधितांना सुनावणीची नोटीस पाठविण्यात येते व कनिष्ठ कार्यालयाकडुन मुळ संचिका मागविल्या जातात.
-
सदर प्रकरणी नियमीत सुनावणी होवुन दोन्ही पक्षकार यांना त्यांचे म्हणणे मांडणेकामी पुरेशी संधी देण्यात येते, तदनंतर प्रकरण निर्णयासाठी बंद करण्यात येऊन प्रकरणी निर्णय पारीत करण्यात येतो.
-
अपिल/पुनरिक्षण / पुनर्विलोकन याबाबत सुनावणी दिनांक, केस बोर्ड, निकालपत्र, केस शोध इ. तपशील www.eqjcourts.gov.in या संकेतस्थळावर नियमित अदयावत करणेत येत असून, सदर तपशील नागरिकांना पहावयास उपलब्ध आहे.
नागरिकांची सनद
अ.क्र. | विषय | सेवा पुरविणारे अधिकारी /कर्मचारी यांची नावे व हुद्दा | सेवा पुरविण्याची विहित मुदत | सेवा मुदतीत न पुरविल्यास तक्रार करावयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नाव व हुद्दा |
---|---|---|---|---|
1 | माहितीचा अधिकार अधिनियम 2005 | जन माहिती अधिकारी तथा सहाय्यक महसूल अधिकारी (अपील शाखा) सहा.जन माहिती अधिकारी तथा महसूल सहाय्यक (अपील शाखा) | 30 दिवस | प्रथम अपिलीय अधिकारी तथा नायब तहसिलदार (अपील शाखा) |
2 |
|
नायब तहसिलदार, लघुलेखक, सहाय्यक महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक | 90 दिवस, नोटीस काढणे व रोजखर्डा नोटीस बोर्डावर लावणे | अपर विभागीय आयुक्त नाशिक |