प्रादेशिक विभागीय चौकशी शाखा
प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी, नाशिक विभाग, नाशिक
महाराष्ट्र राज्य शासकीय गट अ व गट ब (राजपत्रित) अधिकारी यांच्या विरुध्दच्या शिस्तभंग विषयक कार्यवाहीतील चौकशी विभागीय चौकशी नियमपुस्तिका, 1991 नुसार पूर्ण करुन शिस्तभंग विषयक प्राधिकारी यांना अहवाल सादर करण्यासाठी ‘प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी’ यांची यंत्रणा महसूल विभाग स्तरावर असलेल्या सहा प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आली आहे. त्यानुसार प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी, नाशिक विभाग, नाशिक यांचे कार्यालय मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांच्या अंतर्गत निर्माण करण्यात आले आहे.
सदर कार्यालयांसाठी सामान्य प्रशासन विभाग यांच्यामार्फत दि.28 ऑक्टोबर, 2009 रोजीच्या शासन निर्णयान्वये पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. सदर आकृतीबंधानुसार प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी यांच्या कार्यालयासाठी एकूण 4 पदे मंजूर करण्यात आली आहेत.
तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 10 जुलै, 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी यांच्या कार्यालयांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आली असून दोन नवीन पदांच्या निर्मितीस मंजुरी देण्यात आली आहे. सुधारित आकृतीबंधानुसार आता या कार्यालयाची पदसंख्या एकुण सहा झाली आहे.
त्यापैकी चौकशी अधिकारी हे पद मंत्रालयीन उपसचिव किंवा समकक्ष अथवा त्यापेक्षा वरिष्ठ वेतनश्रेणीतील राज्य शासकीय अधिकाऱ्याकडून सामान्य प्रशासन विभागामार्फत बदलीने भरण्यात येते आणि लघुलेखक (निम्नश्रेणी), लिपीक-टंकलेखक व शिपाई ही उर्वरीत तीन पदे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या स्तरावरून प्रतिनियुक्तीने भरण्यात येतात. तसेच सहायक कक्ष अधिकारी आणि एक लिपिक-टंकलेखक ही दोन नविन पदे सामान्य प्रशासन विभागाच्या नियंत्रणाखाली असून मंत्रालयीन विभागांतील कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने भरण्यात येतात.
मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग येथील, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी यांच्या कार्यालयाचा तपशिल.
मुद्दा | विवरण |
---|---|
कार्यालयाचे नांव | प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी यांचे कार्यालय, नाशिक विभाग, नाशिक |
पत्ता | प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी यांचे कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड, नाशिक – 422 101. |
कार्यालय प्रमुख | प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी, नाशिक विभाग |
कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त | सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई |
कार्यक्षेत्र | नाशिक विभागीय कार्यक्षेत्र (नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव आणि अहिल्यानगर या पाच जिल्हयांचे कार्यक्षेत्र) |
कामाचे विस्तृत स्वरुप |
शासन / शिस्तभंग विषयक प्राधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या नाशिक विभागातील गट-अ व गट-ब या संवर्गातील अधिकारी यांच्या विभागीय चौकशी प्रकरणी, विभागीय चौकशी नियमपुस्तिका, 1991 नुसार चौकशी प्रक्रिया पार पाडून त्या विषयीचे निष्कर्ष शासनास/शिस्तभंग विषयक प्राधिकरणास अहवालाव्दारे सादर करणे.
|
कार्यालयातील दूरध्वनी क्रमांक व ई मेल आय डी | Phone: 0253-2462401 to 3, Ext. 328, 329 Email: rdeo[dot]nashikdiv[at]gmail[dot]com |
मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग येथील, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा संघटनात्मक तक्ता
अ.क्र. | अधिकारी | पद |
---|---|---|
1 | प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी, नाशिक विभाग, नाशिक | 1 पद |
2 | सहाय्यक कक्ष अधिकारी | 1 पद |
3 | लघु लेखक (निम्न श्रेणी) | 1 पद |
4 | लिपीक – टंकलेखक | 2 पद |
5 | शिपाई | 1 पद |
मा. विभागीय आयुक्त, नाशिक विभाग येथील, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा तपशिल
अ.क्र. | पदनाम | अधिकारी / कर्मचारी यांचे नाव | वर्ग | पत्ता, दुरध्वनी क्रमांक व ई-मेल आय डी |
---|---|---|---|---|
1 | प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी, नाशिक विभाग | डॉ. श्रीनिवास कोतवाल | 1 | प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी यांचे कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड, नाशिक – 422 101. फोन: 0253-2462401 to 3, एक्सटी. 328, 329 ईमेल: rdeo[dot]nashikdiv[at]gmail[dot]com |
2 | सहाय्यक कक्ष अधिकारी | रिक्त | 2 | |
3 | लघु लेखक (निम्नश्रेणी) | श्रीम. राजश्री साळवे | 3 | |
4 | लिपीक – टंकलेखक | श्री. भगवान पवार | 3 | |
5 | लिपीक – टंकलेखक | श्री. नितिन पाटील | 3 | |
6 | शिपाई | श्री. मारुती घोटेकर | 1 |