बंद

    ताळमेळ शाखा माहिती

    विभागीय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली ताळमेळ शाखेचे कामकाज चालते. सदर शाखेत महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, शासन निर्णय क्र.S-5/69/259238-K/Accounts Unit दि. 14.4.1977 अन्वये विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवर.सदर परिपत्रकान्वये अंतर्गत लेखा पथकाच्या कामाचे स्वरुप व कामाचे वाटप ठरविण्यात आलेले आहे. शासन परिपत्रक क्र. विनिप/07/2006/प्र.क्र.49/पीएससी. 1 मंत्रालय, मुंबई दि.27.7.2006 अन्वये महसूली विभागातील क्षेत्रीय कार्यालयांच्या अचानक तपासणीचे (खर्चाचे लेखापरिक्षण) निर्देश देण्यात आले आहे. सहा संचालक व कार्यासन अधिकारी, महसूल व वन विभाग, मुंबई यांचेकडील पत्र क्र.अंलेप.07/2006/प्र.क्र.44/ पीएसी-1 दि. 19.7.2016 अन्वये सहाय्यक संचालक (ताळमेळ) यांनी शासनाचे/विभागीय आयुक्तांचे आदेशाने अधिनस्त कार्यालय/शाखांचे आवश्यकतेप्रमाणे विशेष लेखा परीक्षण (विशेष लेखापरीक्षण)/चाचणी लेखा परिक्षण (चाचणी लेखापरीक्षण)/ सविस्तर लेखा परिक्षण (तपशीलवार लेखापरीक्षण) करण्याबाबत सूचना केल्या आहेत, त्यानुसार कार्यवाही करण्यात येते.

    ताळमेळ शाखेतील कार्ये व कर्तव्ये यांचा तपशिल

    • खर्च ताळमेळ, महालेखापाल खर्च परिच्छेद अर्थसंकल्प, अनुदान वाटप, लोकलेखा समिती, विनियोजन अहवाल, वित्तीय विषयक बाबी इत्यादी व अधिनस्त कार्यासनावर नियंत्रण

    • महालेखापाल मुंबई यांचेकडील प्रलंबित परिच्छेद, महसूल व वन विभागकडील प्रलंबित तपशिलवार देयके, अंतर्गत लेखापरिक्षण पथक चे जमेचे रु. 200000/- वरील परिच्छेदांना मान्यता, विभागाची तहसिल कार्यालयांची संक्षिप्त तपासणी व त्या अनुषंगाने परिच्छेदांच्या अनुपालनाची छाननी करून मान्यतेस सादर करणे, विधानसभा / विधानपरिषद तारांकीत प्रश्न, वित्तीय शिस्तीबाबतची उपाययोजना

    • जिल्हयांकडून व विभागीय आयुक्त कार्यालयातील लेखा शाखेकडून प्राप्त झालेले खर्च ताळमेळ, विनियोजन लेखे, चारमाही, आठमाही व वार्षिक अर्थसंकल्प एकत्रितरित्या शासनास सादर करणे, लेखाशिर्ष 2053, 2045, 2029, 7610, 2235 ठेवसंलग्न विमा योजना इत्यादी अंतर्गत अनुदान वाटप करणे व वेळोवेळी आवश्यकतेनुसार मागणी सादर करणे, लोकलेखा समितीच्या बैठकीच्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती सादर करणे, उपस्थित राहणे, विभागातील बीडीएस करणे व पासवर्ड करणे.

    • पाणीपुरवठा योजनेअंतर्गत लेखाशिर्ष 2215 ए 195 व 2215 ए 201 चे अनुदानाची मागणी व वाटप करणे, सुधारीत अंदाजपत्रक, अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक, कार्यक्रम अंदाजपत्रक, संबंधित लेखाशिर्षाअंतर्गत उपयोगिता प्रमाणपत्र व विनियोजन लेखे शासनास सादर करणे व ताळमेळ शाखेतील आस्थापना विषयक कामकाज, टपाल वाटप करणे.

    • लेखाशिर्ष 2245- नै.आपती निवारणार्थ अर्थसहाय्य अनुदान वाटप, समर्पित अहवाल, उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करणे, लेखाशिर्ष 22353195 शेतकरी आत्महत्या, अंतर्गत बाधित व्यक्तींना अनुदान वाटप करणे, समर्पित अहवाल, उपयोगिता प्रमाणपत्र, ताळमेळ, लेखाशिर्ष 22350311 निवासी इमारत कोसळून मयत झालेल्या व्यक्तीचे अर्थसहाय मागणी शासनास सादर करणे व आलेले अनुदान संबंधितास वाटप करणे, सुधारीत अंदाजपत्रक, अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक, विभागाचे कार्यक्रम अंदाजपत्रक शासनास सादर करणे, संबंधित लेखाशिर्षाअंतर्गत उपयोगिता प्रमाणपत्र व विनियोजन लेखे शासनास सादर करणे, कोव्हीड-19 अनुदान अंतर्गत वाटप करणे, उपयोगिता प्रमाणपत्र, समर्पित अहवाल, ताळमेळ शासनास सादर करणे, विषयांशी संबंधित पत्रव्यवहार करणे.